आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

आपणास माहीत आहे काय ?

1-11-2005 पूर्वी नोकरीस लागलेले शासकीय कर्मचारी, 100%  अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ अध्यापक महविद्यालय यातील कर्मचारी, कॄषिसेवक, ग्रामसेवक, जिल्हा परिषद कर्मचारी वगैरेना महाराष्ट्र नागरी सेवा ( निवॄत्ती वेतन) नियम 1982 लागू आहेत. या वर्गातील कर्मचा-यांचे निवॄत्ती वेतनाची प्रकरणे महालेखाकार मुंबई/ नागपुर यांच्या मान्यतेसाठी पाठविली जातात व त्या कार्यालयातर्फे निवॄत्ती वेतन अदा करण्याबाबतचे अंतिम  आदेश काढले जातात.

महालेखाकार यांचे कार्यालयात प्रकरण गेल्यावर त्या प्रकरणाची प्रगती व सद्यस्थिती सर्व संबंधितांना ज्ञात व्हावी म्हणून महालेखाकार मुंबई व नागपूर यांची स्वतंत्र वेबसाईट आहे या दोन्ही वेबसाईट्ची लिंक या
ब्लॉगवर " कर्मच-यासाठी इतर उपयुक्त ब्लॉग व लिंक" या शिर्षकाखाली दिली आहे. या लिंकद्वारे  संबंधित वेबसाईट वर जाऊन महालेखाकार मुंबई / नागपुर यांचे कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सद्यस्थिती आपणास जाणून घेता येईल. 

  सर्व संबंधितानी याचा जरूर फायदा करून घ्यावा.

1 comment: