आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

विभागीय परिक्षा उशीरा उत्तीर्ण झाल्याने परिविक्षाधीन कालावधी वाढविला गेला तरी सेवाज्येष्ठता अबाधित राहते.

सरळसेवाप्रवेशाने 2002 मध्ये भरती झालेले तहसीलदार, विभागीय परिक्षा वेळेत उत्तीर्ण झाल्याने त्यांचा परिविक्षाधीन कालावधी वाढविला गेला.सदर तहसीलदार 2007 मध्ये विभागीय परिक्षा उत्तीर्ण झाले व त्यानी परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र त्याना निर्गमित करण्यात आले.
2002 मध्ये सरळसेवाप्रवेशाने भरती झालेल्या तहसीलदाराना उपजिल्हाधिकारी पदावर लवकरच पदोन्नती दिली जाणार आहे. तेव्हां विभागीय परिक्षा उशीरा उत्तीर्ण झाल्याने परिविक्षाधीन कालावधी वाढविलेल्या तहसीलदारांचा उपजिल्हाधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी त्यांच्या सहका-याबरोबर विचार केला जाईल किंवा कसे याबाबत सल्ला घेण्यासाठी  संबंधितानी  माझ्याशी संपर्क साधला.

शासकीय कर्मचा-याची सेवाज्येष्ठता, " म.ऩा.से, (सेवाज्येष्ठता) नियम 1982 " च्या नियम 4 मध्ये असलेल्या तरतूदीनुसार ठरविली जाते. लोकसेवा आयोगातर्फे निवड होऊन सरळसेवाप्रवेशाने  नियुक्त झालेल्या    अधिका-यांची सेवाज्येष्ठता आयोगाने, गुणांनुसार केलेल्या निवडसूचीतील अनुक्रमांकानुसार करावी अशी स्पष्ट तरतूद नियम 4 मध्ये आहे.विभागीय परिक्षा उशीरा उत्तीर्ण झाल्याने परिविक्षाधीन कालावधी वाढविला गेला आहे अशा अधिका-यांच्या सेवाज्येष्ठतेवर विपरित परिणाम होईल अशी तरतूद  नियमात कोठेही नाही.उपजिल्हाधिकारी या पदावरील पदोन्नती साठी तहसीलदारांची 5 वर्षे सेवा झाली असली पाहिजे एव्हढीच अट आहे. तेव्हां 2002 मध्ये सरळसेवाप्रवेशाने भरती झालेल्या परंतु विभागीय परिक्षा 2007 मध्ये उत्तीर्ण झालेल्या तहसीलदारांचा , 2002 मध्ये भरती होऊन विभागीय परिक्षा वेळेत उत्तीर्ण झालेल्या तहसीलदारांबरोबरच पदोन्नती साठी विचार होणॆ आवश्यक आहे. असे न केल्यास संबंधितांवर अन्याय होईल व त्याना न्यायाधिकरण/न्यायालयात दाद मागता येईल.

2 comments:

  1. मन:पूर्वक धन्यवाद .याची माहिती इतर कर्मचारी बंधूना द्या.

    ReplyDelete
  2. Your Blog is very useful to all govt employees...

    ReplyDelete