आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या महागाई भत्त्याच्या दरात १ जुलै २०१३ पासून १० टक्के वाढ

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचा-यांच्या महागाई भत्त्याच्या दरात  १ जुलै २०१३ पासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे. आता कर्मचा-यांचा महागाई भत्ता ८० टक्के वरून ९० टक्के झाला आहे. १ ऑक्टोबर २०१३ पासून वाढीव दराने दिला जाणारा महागाई भत्ता रोख रकमेत दिला जाईल. १ जुलै २०१३ ते३० सप्टेंबर या काळाची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी कशी दिली जाईल याबाबतीत शासन स्वतंत्र आदेश काढणार आहे.

वरील बाबी स्पष्ट करणारा शासन निर्णय राज्य शासनाने  दि.  ८ ऑक्टोबर २०१३ रोजी काढला आहे. तो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.