आजचा सुविचार १२ जून २०१८

फुले नित्य फुलतात.ज्योती अखंड उजळतात.आयुष्यात चांगले माणसे नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो. पण जोडणे हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७९ ,वित्त विभागाने प्रसिध्द केलेली उपयुक्त पुस्तिका

विविध बाबींवर खर्च करण्याच्या बाबतीत मुंबई वित्तीय नियम १९५९ अंतर्गत नियमाखाली कोणते अधिकार प्रशासनिक विभाग, विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना देणेत आले आहेत हे दर्शविणारी एक अत्यंत उपयुक्त पुस्तिका राज्याच्या वित्त विभागाने १५ मे  २००९ च्या शासन निर्णयान्वये वितरीत  केली आहे.

सदर पुस्तिका सर्व संबंधीतानी अत्यंत उपयुक्त आहे. सबब ती या ब्लॉगवर  " नुकतेच व महत्वाचे - शासन निर्णय, परिपत्रके ज्ञापन " या शीर्षकाखालील यादीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व संबंधीतानी ती कार्यालयीन उपयोगाकरिता ती डाउनलोड करून घ्यावी .

No comments:

Post a Comment