सामान्य प्रशासन विभागाच्या , दिनांक २२-८-२००५ च्या शासन निर्णया नुसार अनुकंपा नियुक्तीसाठी गट "क" व गट "ड" मध्ये प्रतिवर्षी रिक्त होणा-या पदांच्या ५% टक्के पदांची मर्यादा विहित करण्यात आली आहे.. या मर्यादेमुळे, अनुकंपाधारकांना प्रत्यक्ष नियुक्ती मिळण्यासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन ,अनुकंपा नियुक्तीसाठी असलेल्या ५% टक्के मर्यादेत वाढ करून अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतिवर्षी रिक्त होणा-या गट "क" "गट "ड" च्या पदांच्या १० टक्के मर्यादा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकत्ताच म्हणजे १ मार्च रोजी निर्गमित केला आहे.
सदर शासन निर्णय या ब्लॉगवर " नुकतेच व महत्वाचे" या शीर्षकाखालील यादीत उपलब्ध करून देण्यात आला आहे, जरूर तर तो डाउनलोड करून घेता येईल.
सदर शासन निर्णय या ब्लॉगवर " नुकतेच व महत्वाचे" या शीर्षकाखालील यादीत उपलब्ध करून देण्यात आला आहे, जरूर तर तो डाउनलोड करून घेता येईल.
PSI ha varg अनुकंपा नियुक्ती करीता patra aahe ka?
ReplyDelete