आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

उच्च न्यायालयाने शासनाच्या विरुध्द निर्णय दिल्यास किंवा सर्वोच्च न्यायालयाने शासनाने केलेल्या अपिलावर उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती न दिल्यास करावयाची कार्यवाही.

उच्च न्यायालयाने शासनाच्या विरुध्द निर्णय दिल्यास किंवा सर्वोच्च न्यायालयाने शासनाने केलेल्या उच्च न्यायालयाच्या  निर्णयाविरुध्द केलेल्या अपीलात, उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती न दिल्यास नेमकी काय कार्यवाही करावी यासंदर्भात शासनाच्या ' विधी व न्याय  विभागाने" नुकतेच म्हणजे २ एप्रिल २०१४ रोजी एक महत्वपूर्ण परिपत्रक काढले आहे . सदर परिपत्रक या ब्लॉगवर " नुकतेच व महत्वाचे " या शीर्षकाखाली उपलब्ध करून देणेत आले आहे.

उच्च न्यायालयाने शासनाच्या विरुध्द निकाल दिल्यास त्या निकालाच्या विरुध्द सर्वोच्च न्यायालयात अपील करण्या संबंधीची कार्यवाही ( अर्थात विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने) करावी.तसेच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती न दिल्यास उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. तसे न केल्यास उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून संबंधित अधिका-या विरुध्द कारवाई होऊ शकते असे सदर परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

वरील परिपत्रकातील सूचनांची सर्व संबंधितानी नोंद घेणे गरजेचे आहे. 


1 comment:

  1. नमस्कार,
    मला मुळ अर्ज क्र. 361/09 नुसार आणि रिट याचिका 1419/11 प्रमाणे सेवा जेष्ठतेचे लाभ मंजूर केले आहेत. परंतु धर्मादाय विभाग माझ्या लगतच्या कनिष्ठाप्रमाणे मला मानीव दिनांक मजूर करत नाहीत. दिनांक 02/04/14 मी 14/10/15 रोजी निवेदन दिले असुन माझे निवेदन खारीज झाल्यास मी कादयाप्रमाणे मी काय कार्यवाही करावी याबाबत मार्गदर्शन करावी, ही नम्र विनंती.
    **विजय नरवाडे वरिष्ट लिपीक, सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय, नंदुरबार.**

    ReplyDelete