आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

गैरवर्तणूक म्हणजे काय ?

राज्यशासनाच्या कर्मचा-यांसाठी  महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक नियम) आहेत. सदर नियमांत कर्मचा-यांची वर्तणूक  कशी असली पाहिजे हे नमूद करण्यात आले आहे.या नियमांतील तरतुदींच्या विरुध्द वर्तणूक म्हणजे गैरवर्तणूक असे फार तर म्हणता येईल. तरी गैरवर्तणुक म्हणजे नेमके काय याचा नेमका खुलासा होत नाही. शिस्तभंग विषयक कारवाई करताना कर्मचा-याची नेमकी गैरवर्तणूक काय आहे हे दोषारोप पत्रात व विवरण पत्रात नमूद करणे हे शिस्तभंग विषयक अधिका-यावर बंधनकारक आहे.त्यामुळे गैरवर्तणूक म्हणजे काय हे सर्व संबंधितांना कळणे आवश्यक आहे.
गैरवर्तणूक म्हणजे नेमके काय हे सर्वोच्च न्यायालयाने व उच्च न्यायालयांनी आपल्या अनेक निकालपत्रात स्पष्ट केले आहे.अशा निकालपत्रापैकी खाली नमूद केलेली ८ महत्वाच्या प्रकरणातील  निकालपत्रे  वाचल्यावर गैरवर्तणूक ही संकल्पना स्पष्ट होईल.

१) बलदेव सिंग गांधी विरुध्द पंजाब सरकार 
२) एम. एम. मल्होत्रा विरुध्द भारत सरकार 
३) जे.जे.मोदी विरुध्द मुम्बई राज्य 
४) भारत सरकार विरुध्द जे. अहमद 
५) इ.एल.कालरा विरुध्द पी.आणि इ. कार्पोरेशन 
६) पंजाब सरकार विरुध्द रामसिंग 
७) भारत सरकार विरुध्द के.के.धवन 
८) बी सी.चतुर्वेदी विरुध्द भारत सरकार.

वे नमूद केलेली निकालपत्रे  या ब्लॉग वर अपलोड केली आहेत.  ती " विभागीय चौकशी- न्यायालयीन निर्णय - महत्वाचे न्यायालयीन " या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक २७ त ३४ येथे उपलब्ध आहेत.संबंधितांना  ती जरूर डाउनलोड करून घ्यावीत व त्याचा अभ्यास करावा.

4 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. एखादया शासकीय अधिकाऱ्यांने दुसऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची शासकीय कामातील अनियमितेबाबत पोलीस स्टेशमध्ये तक्रार नोंदविली तर ते बरोबर आहे किंवा चूक? त्याने कोणत्या नियमांनुसार/शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना यानुसार कार्यवाही करणे आवश्यक होते.

  ReplyDelete
 3. मा.एका शासकीय अधिकारीने एक दाखल गुन्हयाची दोन पोलिस रिपोर्ट जावक नंबर आणि दोन कोर्ट केस नंबर मध्ये फरार आरोपी हे अटक आरोपींना माहिती असून आजतागायत शासकीय कामात अडथळा निर्माण झाला आहे.म्हणजे सामान्य माणसाला न्याय खरे का सरकार काय आहे हा प्रकार मात्र आजतागायत आरोपी फरार.माझा फोन नंबर ८८०६३११७०५

  ReplyDelete
 4. वेतनातून वसुलीची मर्यादा किती असावी.ऐकुन वेतनावर की मुळ वेतनवर मर्यादा असते.2)वसुली किती वर्षात पुर्ण व्हावी.3)वेतनातून वसुलीची शिक्षा दिली पदावन्नत करुन मुळवेतनावर आनले व वसुली सुरू केली निर्माण योग्य आहे काय?

  ReplyDelete