आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

निनावी व खोटया तक्रारी, खोटया सहीने केलेल्या तक्रारी याबाबत करावयाची कार्यवाही .

शासकीय कार्यालयात काम करणा-या कर्मचा-याविरुध्द विविध प्रकारच्या तक्रारी येत असतात.यातील सर्वच तक्रारी ख-या असतात असे नव्हे, अनेक वेळा तक्रारी निनावी असतात  किंवा खोट्या सहीने केलेल्या असतात.काही वेळा तक्रारी खोट्या देखील असतात. अशा तक्रारी संदर्भात नेमकी काय कार्यवाही करावी याबाबत अनेक अधिका-यामध्ये साशंकता असते.त्यामुळे अशा तक्रारींची चौकशी करण्यासाठी अशा तक्रारी दुय्यम कार्यालयाकडे पाठविल्या जातात. त्यामुळे त्या कार्यालयांचा वेळ तर जातोच पण प्रामाणिक कर्मचा-यांचे नैतिक धैर्यावर विपरीत परिणाम देखील होतो. त्यामुळे अशा तक्रारी  बाबत नेमकी काय कार्यवाही
 याबाबत शासनाने दिनांक २५ फेब्रुवारी  २०१५ रोजी काढलेल्या परिपत्रका द्वारे सविस्तर सूचना काढल्या आहेत. त्या सर्व  संबंधितानी वाचून अंमलात आणणे  आवश्यक आहे.  

वर नमूद केलेले  दि. २५ फेब्रुवारी २०१५ चे सामान्य प्रशासन विभागाने काढलेले परिपत्रक  या ब्लॉगवर " निर्गमित केलेली नवीन परिपत्रके व शासन  निर्णय" या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १६३  वर उपलब्ध आहे. जरूर तर ते डाउनलोड करून घेता येईल.

4 comments:

  1. There is no serial number 163 available in the link as mentioned in the post. Kindly confirm. Thanks.

    ReplyDelete
  2. एखादया शासकीय अधिकाऱ्यांने दुसऱ्या शासकीय अधिकाऱ्याविरुध्द पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असल्यास, त्याने शासकीय नियमानुसार कोणत्या पध्दतीचा अवलंब करुन तक्रार दाखल करणे आवश्यक होते. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना पोलिसांमध्ये तक्रार न करता म.ना.से. (वर्तणूक) नियमानुसार वरिष्ठांकडे तक्रार करणे या विषयाबाबत काही शासन निर्णय किंवा अधिसूचना उपलब्ध आहेत का? शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी पोलीसांमध्ये तक्रार न दाखल करता विहीत कार्यप्रणालीबाबत काही शासन निर्णय किंवा अधिसूचना उपलब्ध आहेत का?

    ReplyDelete