आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

विभागीय चौकशी - रोजनामा किंवा डेली ऑर्डर शीट

विभागीय चौकशीचे वेळी सुनावणी च्या प्रत्येक दिवशी रोजनामा ( Daily order Sheet ) लिहिणे  आवश्यक असते.सदर रोजनाम्यात सुनावणीचे वेळी घडलेल्या सर्व गोष्टींची व चौकशीचे संदर्भात केल्या कार्यवाहीची नोंद करावयाची असते.अपचारी कर्मचा-याला  नियमानुसार त्याची बाजू मांडण्याची संधी दिली आहे किंवा नाही याची खात्री न्यायालयास सदर नोंदीवरून करता येते. रोजनामा ठेवला नसल्यास व इतर कोणताही पुरावा नसल्यास कर्माचा-यांस योग्य ती संधी दिली नाही असा निष्कर्ष न्यायालय काढू शकते.मात्र रोजनामा लिहिलेला नसल्यास चौकशीचे वेळी नेमके काय घडले याबाबत  चौकशी अधिका-याने दिलेला जवाब संपूर्णपणे ग्राह्य धरला जाईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने Union of India v/s T.R.Varma या प्रकरणांत दिलेला आहे. सदर निकालपत्र  या ब्लॉगवरील " शिस्तभंग कार्यवाही- महत्वाचे न्यायालयीन निर्णय" या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक ३५ वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment