आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

शिस्तभंग विषयक कार्यवाही संदर्भातील सादरीकरणे

शिस्तभंग विषयक कार्यवाही कशी केली जाते , महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) व महारष्ट्र नागरी सेवा(शिस्त व अपील) नियम १९७९ व अनुषंगिक विषयावर बोलण्यासाठी मला यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी तसेच केंद्र शासनाच्या विविध प्रशिक्षण संस्थामध्ये पाचारण केले जाते.त्यावेळी  Power Point च्या मदतीने  सादरीकरण केले जाते.  शिस्तभंग विषयक कार्यवाही संदर्भातील विविध मुद्दे, तसेच   प्रशिक्षणार्थी यांना ज्ञान अवगत झाले किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी प्रश्नोत्तरांचा अंतर्भाव सदर सादरीकरणात केलेला असतो. सदर सादरीकरणाचा मला व प्रशिक्षणार्थी यांना  खूप फायदा होतो असा अनुभव आहे. सादरीकरणाच्या प्रती प्रशिक्षणार्थी यांच्या विनंतीवरून त्यांना दिल्या जातात.
राज्यशासनाचे कर्मचारी तसेच केंद्रीय कर्मचा-यांना या विषयाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थामध्ये अध्यापक वर्ग असतो .तसेच प्रशिक्षण देण्यासाठी Guest Faculty आमंत्रित केली जाते. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या सर्वच कर्मचा-यांना सदर सादरीकरणें  उपलब्ध व्हावीत म्हणून ही सादरीकरणे या ब्लॉगवर "शिस्तभंगविषयक कार्यवाही - सादरीकरणे" या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत.कांहीं सादरीकरणे मराठीत तर कांहीं सादरी  इंग्लिश मध्ये आहेत. इच्छा असेल त्यांना ती डाउनलोड करून घेता येतील.  

7 comments:

 1. नमस्कार सर सेवाजेष्ठतेबाबत दाखल केलेल्या अर्ज क्र.361/09 न्यायीक निर्णय माझ्या बाजुने असुन शासनाने दाखल केलेल्या अपिल रिट याचिका क्र.1419 /11 मधील दि.28.11.2013 राेजीच्या अंतरिम आदेशा नुसार स्थगीती दिलेली नसुन मा.मॅटचा निकाल कायम केला आहे. तरीही धर्मादाय विभागाने मागील 6 वर्षो पासुन मला कनिष्ठांप्रमाणे पदौन्नतीचा मुळ/सुधारित पदौन्नती दिनांक, मानिव दिनांक मंजुर केलेला नाही, सर्व अनुषंगीक सेवालाभ अद्यापपावेतो मंजुर केलेले नाहीत. ते शासन परिपत्रक, विधि व न्याय विभाग, दि.2.4.2014 नुसार देय आहेत. तरी कनिष्ठांप्रमाणे मुळ /सुधारित पदौन्नती दिनांक, मानिव दिनांक, अनुषंगीक सेवालाभ मंजुरीसाठी मी कोणती कायदेशीर कार्यवाही करु हयाबाबत कृपया मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.***विजयकुमार पं. नरवाडे पाटील, वरिष्ठ लिपीक, धर्मादाय कार्यालय, नंदुरबार.

  ReplyDelete
 2. न्यायिक निर्णयाची व MAT च्या निर्णयाची प्रत मला यशदा , राजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोडपुणे ४११००७ या पत्त्यावर पाठवावी म्हणजे मी आपल्याला योग्य तो सल्ला देऊ शकेन. कळावे, ,

  ReplyDelete
 3. नमस्कार सर ,
  मी राहुल वाघ ( ना. तहसीलदार अक्कलकुवा जि .नंदुरबार).
  मला मंडळ अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आलेल्या दोषारोपांसदर्भात साक्ष देण्यासाठी गडचिरोली येथे बोलावले आहे. मला नंदूरबार हुन गडचिरोली जाणे शक्य नसल्याने लेखी जबबज पाठवायचा आहे. कृपया मार्गदर्शन मिळावे.

  दोषारोप
  १) वरिष्ठांचे न ऐकने ( ज्यात माझा रोल नाही).
  २) नदी घाटावर तपासणी साठी जाणे पण वरिष्ठांना माहिती न देणे किंवा चुकीची देने ( मी परिविक्षाधीन कालावधीत एकदाच संबंधितासोबत घाट पहानिसाठी गेलो होतो).


  सर याबाबत मी जबाब कसा लिहावा हे सुचत नाही आहे.
  Please नमुना स्वरुपात एखादा जबाब पहायला मिळाला तर तसं लिहीता येईल.

  ReplyDelete
 4. नमस्कार सर उल्हासनगर ३ चोपडा कोर्ट २ वर्ग केस क्र R.c.c.1000477 (४७७) सदर आपले सरकार तक्रार आयडी क्र Dist/CLTH/2018/5031 या मध्ये कोर्ट केस क्र ४४७
  नोंद आहे या तक्रारी मध्ये फरार आरोपींना गुन्हे प्रकटीकरण कर्मचारी व अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहे माञ आजतागायत फरार आरोपी कोर्टात हजर करण्यात आले नाही सर पोलीस रिपोर्ट जावक क्र ४७१ व ४९८ या मध्ये फरार आरोपी ही आटक आरोपींना माहिती असून आजतागायत फरार आरोपी मोकाट फिरत आहे सर उल्हासनगर १ पोलिस स्टेशन Fir क्र i23/2013 फोजदारी खटला चा रितसर चौकशी करण्यात आले नसून शिस्तभंग झालेला आहे सर माझ्या अपंग भावाला न्याय मिळावे हेच माझी भावना आहे आपन मला सहकार्य करुन रितसर कागदपत्रे तपासून मला सहकार्य करावे सहकार्यचे आपेक्षा माझा फोन नं ८८०६३११७०५

  ReplyDelete
 5. Shistabhanga karwai mhnje ky ani tyachi punishment ky aste.pune PMC teacher ahe.plz reply sir

  ReplyDelete
 6. Shistabhanga karwai mhnje ky ani tyachi punishment ky aste.pune PMC teacher ahe.plz reply sir

  ReplyDelete
 7. सेवानिवृत्त उपअभियंता यांचे गैरवर्तणुकी बाबत अधिकारी कर्मचारी यांना त्रास होत असल्याने त्याबद्दल काही नियम आहेत का

  ReplyDelete