आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

अपील प्रकरणात अपचारी कर्मचा-यांस वैयक्तिक सुनावणीची संधी व बचाव सहाय्यकाची मदत

केंद्रीय कर्मचा-यांच्या बाबतीत ,अपचारी कर्मचा-याने त्यास दिलेल्या शिक्षेविरुध्द अपील केल्यास , अपीलावर निर्णय देण्यापूर्वी त्यास अपिलीय अधिका-यास योग्य वाटल्यास वैयक्तिक सुनावणीची संधी देता येते व अपिलाचे सुनावणीचे वेळी त्यास बचाव सहाय्यकाचे साहाय्य देता येते अशा केंद्र शासनाच्या सूचना आहेत,अशाच तऱ्हेच्या सवलती राज्यशासनाच्या बाबतीत , अपचारी कर्मचा-यांना देण्यात याव्यात व त्या  संदर्भात मार्गदर्शक सूचना काढाव्यात असे  राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागास यशदाच्या मोफत सल्ला कक्षा तर्फे कांही दिवसापूर्वी   सुचविण्यात आले होते.आणि आनंदाची बाब अशी की सामान्य प्रशासन विभागाने याबाबत दिनांक ५ डिसेंबर रोजी शासन निर्णय जरी केला आहे.

ज्या प्रकरणी कर्मचाऱ्यास जबर शिक्षा देण्यात  आली आहे  त्या प्रकरणी कर्मचाऱ्याने विनंती  केल्यास संबंधित अपील प्राधिकरण, प्रकरणाची वस्तुस्थिती विचारांत  घेऊन, स्वेच्छाधिकारानुसार, वैयक्तिक सुनावणीची परवानगी  देऊ शकेल. तसेच, ज्या प्रकरणी वैयक्तिक सुनावणीस परवानगी देण्यात आली आहे त्या प्रकरणी, कर्मचा-याने विनंती  केल्यास त्याला बचाव  सहायकाची मदत  घेण्यास परवानगी देण्यात यावी  अशा सूचना सदर शासन निर्णयाद्वारे काढण्यात आल्या आहेत.

सदर शासन निर्णय या ब्लॉग वरील "निर्गमित केली नवीन परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखालील यादीत अन्क्रमांक १६३ वर उपलब्ध करून देण्या आले आहे, कृपया याची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी