आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

क्रिमी लेअर बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

इतर मागासवर्गीयांचे आरक्षणाचा फायदा उच्च व उन्नत गटातील कुटुंबियांना अनुज्ञेय  नाही. तसेच महाराष्ट्रात   महिलांसाठी असलेल्या  आरक्षणाचा फायदा  खुल्या गटातील उच्च व उन्नत गटांतील महिलांना अनुज्ञेय नाही. उमेदवार उच्च व उन्नत गटातील आहे किंवा कसे हे महसूल खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्या वरून ठरविले जाते.मात्र क्रिमी लेअर म्हणजे काय , त्याची नेमकी व्याख्य काय आहे याबाबत अनेक शंका आहेत त्यामुळे क्रिमिलेअर मध्ये न मोडण-या उमेदवारांना देखील आरक्षणाचा लाभ मिळत नाही.म्हणून मी याबाबत यशदातर्फे प्रसिध्द केल्या जाणा-या यशोमंथन या मासिकात २०११ मध्ये लिहिला होता.सदर लेख व इतर अनुषंगिक साहित्य या ब्लॉगवर " जुने व महत्वाचे " या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक ९.१०.व ११ वर दि.११-४-२०१४ रोजी प्रसिध्द केले आहे.

 क्रिमी लेअर या संज्ञे बाबत अधिक खुलासा व्हावा म्हणून " क्रिमी लेअर वारंवार विचारले जाणारे प्रश्न " आणि " केंद्र शासनाने काढलेल्या पुस्तिकेतील प्रकरण २ चा उतारा व क्रिमी लेअर ठरविण्यासाठीचा व्याख्या असलेला तक्ता  " जुने व महत्वाचे " या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक २७ व २८ वर आज उपलब्ध करून देणेत आला आहे.सर्व संबंधितांना तो उपयुक्त होईल अशी आशा आहे.

क्रिमी लेअर या विषयाची सर्वंकष माहिती व्हावी म्हणून या ब्लॉगवर असलेले सर्वच साहित्य डाउनलोड करून घ्यावे व त्याचा अभ्यास करावा,महसूल खात्याच्या अधिका-यांनी देखील या साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

5 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. Resp Sir]
  jar vibhagiya choukashi madhe chargesheet dili aani enquiry officer nemal nantar apchari yani documents chi magni keli tewha ase lakshat aale ki chrgesheet madhil kahi document madhil outward kiwa chargesheet madhe kahi uniwa hotya tar chargesheet chancel karu shaknar ka shishbhangpradhikar asa konta niyam aahe. pleas inform sir-steno

  ReplyDelete
 3. महोदय,
  वर्ग ४ च्या पदोन्नतीबाबतचे सुधारित शासननिर्णय आपले संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत यावेत अशी नम्र विनंती.

  ReplyDelete
 4. महोदय,
  वर्ग ४ च्या पदोन्नतीबाबतचे सुधारित शासननिर्णय आपले संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत यावेत अशी नम्र विनंती.

  ReplyDelete