आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मध्ये दुरुस्ती

महाराष्ट शासनाने दि. २३ -१०-२०१४ रोजी  अधिसूचना काढून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३, नियम १२ व नियम २२-(अ) मध्ये सुधारणा केली आहे, 

नियम ३ -  शासकीय कर्मचा-याच्या सचोटी व प्रामाणिक पण व्यतिरिक्त इतर कोणती वर्तणूक अपेक्षित आहे या संबंधीच्या इतर बाबी उदाहरणार्थ संविधानाशी वचनबध्दता,राजकीय दृष्टया तटस्थता वगैरे , नियम ३ मध्ये  केलेल्या दुरुस्ती मध्ये स्पष्ट करण्यात आल्या आहेत.. 

नियम १२ -  शासकीय  कर्मचा-यांना देणगी घेण्य संदर्भातील मर्यादा वाढविण्यात आली आहे. सदर  दुरूस्तीनुसार, अ , ब, आणि क गटाच्या कर्मचा-यांसाठी अनुक्रमे २५०००,१५००० व ७००० रुपये अशी करण्यात आली आहे.

नियम २२-(अ)   सदर नियम कामाच्या  ठिकाणी होणा-या लैंगिक छळवादास प्रतिबंध करण्या संदर्भातील असलेला पूर्वीच्या नियमाच्या ठिकाणी नवा नियम अंतर्भूत करण्यात आला आहे, लैंगिक छळवाद म्हणजे नेमके काय हे नव्या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच "कामाचे ठिकाण" या शब्दाची सुस्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे, 

सदर  अधिसूचना या ब्लॉगवरील " नुकतेच व महत्वाचे " या शीर्षकाखालील यादीतील अनुक्रमांक २९ वर उपलब्ध करून देण्यात आली आहे, संबंधितांना ती डाउनलोड करून घेता येईल.

3 comments:

  1. NAMASKAR MI AAPLA BLOGSPOT PAHILA V VACHALA. VACHUN AANAND JHALA. ASHICH PRAGTI AAMCHYA BUDDHICHI HOVO. BHUSHAN SHIKHARE TRAMBAKESHWAR NASHIK 9422268596

    ReplyDelete
  2. सर प्लीज मेस्मा कायद्याचे परिपत्रक असेल तर ब्लाक वरती टाका

    ReplyDelete
  3. सर मी शासकीय आस्थापनेमध्ये खानसामा पदावर कार्यरत आहे. त्याच आस्थापना मध्ये कॅन्टीन चे टेंडर निघाले आहे. माझ्या घरच्यांना ते टेंडर घेता येइल का?

    ReplyDelete