आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

चौकशी अधिकारी व शिस्तभंग विषयक अधिकारी यांचेसाठी पुस्तिका ( केंद्रीय कर्मचारी)

केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचा-यां विरुध्द  विभागीय चौकशी करतांना चौकशी अधिकारी व शिस्तभंग विषयक अधिकारी यांनी काय काळजी घेणे आवश्यक असते यासाठी याबाबतचे नियम , परिपत्रके, निकालपत्रे याबाबत सविस्तर विवेचन करणारी एक सर्वंकष पुस्तिका काही दिवसापूर्वी काढलेली आहे.केंद्रीय कर्मचारी व राज्य शासकीय कर्मचारी यांचेसाठी असलेले शिस्त व अपील नियम यांमध्ये कूप साधर्म्य आहे.त्यामुळे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी देखील सदर पुस्तिका खूप उपयुक्त होईल अशी खात्री झाल्याने ही पुस्तिका " महत्वाच्या पुस्तिका " या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.संबंधीतांनी ती डाउनलोड करून घेऊन तिचा जरूर अभ्यास करावा. 

मंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कांहीं दिवसापूर्वी मंत्रालयातील अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका निर्गमित केलेली आहे. सदर पुस्तिकेत , शासकीय कर्मचारी  - कर्तव्यें व जबाबदा-या , शासकीय कार्यनियमावली ,महत्वाचे नियम, कार्यालयीन कार्यपद्धती , कक्ष अधिका-यांची कार्यें व जबाबदा-या  इत्यादी महत्वाच्या विषयावर अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे. सदर पुस्तिका जरी मंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी आहे असे जरी पुस्तिकेच्या शीर्षकात नमूद केले असले तरी क्षेत्रीय पातळीवरील कर्मचा-यांना देखील उपयुक्त आहे. सबब ही माहिती पुस्तिका " महत्वाच्या हस्तपुस्तिका " या शीर्षकाखाली या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय कर्मचा-यांनी ती जरूर डाऊनलोड करून घ्यावी व तिचा अभ्यास करावा.

राजपत्रित अधिकारी व विभागप्रमुख यांचेसाठी हस्तपुस्तिका

विभागीय चौकशी वरील हा ब्लॉग अनेक जण पाहत असतात. व  त्या संदर्भात काही उपयुक्त सूचना देखील करत असतात. काही दिवसापूर्वी भंडारा  येथे समाजकल्याण कार्यालयात काम करणा-या श्री.किरण कांबळे यांनी असे सुचविले की महाराष्ट्र राज्यपत्रित अधिकारी महासंघाच्या लातूर शाखेचे सरचिटणीस श्री.अण्णाराव भुसने यांनी " राजपत्रित अधिकारी व विभागप्रमुख" यांचेसाठी तयार केलेली हस्तपुस्तिका, ब्लॉग वर टाकावी जेणेकरून त्याचा फायदा अनेकांना होऊ शकेल.सदर पुस्तिका मी डोळ्याखालून घातली व ती सर्व शासकीय कर्मचा-यांना व विशेष करून राजपत्रित अधिकारी व विभाग प्रमुख यांना निश्चित उपयुक्त अशी असल्याचे माझे मत झाले .म्हणून   श्री.अण्णाराव भुसने यांचे संमतीने सदर पुस्तिका ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहे. सर्व संबंधितांना त्याचा लाभ घ्यावा व वाटल्यास पुस्तिका डाउनलोड करून संग्रही ठेवावी म्हणजे त्यांना वेळोवेळी तीचा वापर करता येईल. अर्थात पुस्तिकेचा वापर करण्यापूर्वी त्या विषयाच्या संदर्भात शासनाने काही नवीन शासन निर्णय अथवा परिपत्रका द्वारे कांही सूचना निर्गमित केल्या आहेत किंवा कसे हे पाहणे जरूर आहे.

राजपत्रित अधिकारी व विभागप्रमुख यांचेसाठी अत्यंत परिश्रम घेऊन सदर पुस्तिका तयार केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच पुस्तिका ब्लॉगवर टाकावी हे सुचविल्याबद्दल श्री. किरण कांबळे यांचे मन:पूर्वक आभार.