आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

अद्यावत वर्तणूक नियम ( १-१-२०१७ पर्यंत )

शासकीय कर्मचा-याकरिता शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मध्ये केलेले आहेत, २०१४ पर्यंत केलेल्या दुरुस्त्या लक्षात घेऊन सदर वर्तणूक नियम  या ब्लॉगवर यापूर्वी उपलब्ध करून दिलेले होते. शासनाने सदर नियमातील नियम क्रमांक ३, १२ व  २२-अ  मध्ये  ऑक्टोबर २०१५ मध्ये महत्वाची दुरुस्ती केली. नियम ३ मध्ये केलेली दुरुस्ती     कर्मचा-या विरुध्द दोषारोप पत्र तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे.

सबब  शासनाने सुरुवातीपासून वेळोवेळी केलेल्या सर्व दुरुस्त्या विचारांत घेऊन  १-१-२०१७  पर्यंतचे  अद्यावत वर्तणूक नियम या ब्लॉगवर " महाराष्ट्र नागरी सेवा नियम" या शिर्षकाखाली उपलब्ध करून देणेत आलेले आहेत.सर्व संबंधितानी ते जरूर डाउनलोड करून घ्यावेत. त्यांना ते त्यांची कर्तव्यें पार पडतांना निश्चित उपयोगी ठरतील.

1 comment:

  1. वर्तणूक नियमामध्ये शासनाने वेळाेवेळी सुधारणा केलेल्या आहेत.आपण या blog वर उपलब्धही करून दिलेल्या आहेत.त्याबद्दल आपणास धन्यवाद देणे अत्यंत आवश्यकच आहे.असे मला एक माजी शासकीय कर्मचारी म्हणून वाटते.याबाबतीत शासनाने पुढाकार घेऊन ते पुस्तक छपाई करून घेतले असते तर अधिक उचित ठरले असते.असे मला प्रामाणिकपणे वाटते.

    ReplyDelete