आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

उच्च व उन्नत गट( क्रिमिलेअर) निकष व कार्यपद्धती

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट ( क्रिमिलेअर) वगळून इतरांना आरक्षणाचे फायदे दिले जातात. परंतु उन्नत व प्रगत गटाचे नेमके निकष कोणते आहेत यासंदर्भात अनेकांचे समज- गैरसमज आहेत .त्यामुळे अनेकवेळा याबाबत विचारणा केली जाते. तसेच याबाबत नेमके ज्ञान नसल्याने आरक्षणाचा फायदा पात्र असलेल्या उमेदवारांना मिळत नाही.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने  उन्नत व प्रगत गटाचे नेमके निकष काय आहेत्त व Non Creamy layer Certificate देण्याची कार्यपद्धती कशी राहील याबाबत २५ मार्च २०१३ रोजी एक सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला आहे.त्याचा सर्व संबंधितांनी जरूर अभ्यास  करावा.

Non Creamy layer साठी पूर्वी ४.५ लाख एव्हढी उत्पन्नाची मर्यादा होती. सदर उत्पन्नाची मर्यादा २४ जून २०१३ च्या शासन निर्णयाने ६ लाख करण्यात आली आहे.

दि. २५ मार्च २०१३ व २४जुन २०१३ हे दोन्ही शासन निर्णय या ब्लॉगवर " उन्नत व प्रगत गट" या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधितांनी ते जरूर डाउनलोड करून घ्यावेत.

2 comments:

  1. सर
    सद्य स्थितीच्या शासन निर्णया नुसार अनुकंपा नियुक्ती साठी पात्र संख्या कशी काढावी याबाबत उदाहरणासह मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे
    मो.न. 8446556141

    ReplyDelete
  2. माननीय धनंजय मुंडे साहेब,
    Non creamylyer आणि creamylyer हे सर्टिफ़िकेट बंद करुन टाका.कारण आमच्या उत्पनावरुन समजते आंम्ही प्रगत आहे का अप्रगत.

    ReplyDelete