आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ या पुस्तकाची चौथी आवृत्ती ( ३१-१०-२०१७ पर्यंत सुधारित) प्रसिद्ध झाली

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ या पुस्तकाची  तिसरी आवृत्ती २०१४ मध्ये काढली होती. त्या पुस्तकास उत्तम प्रतिसाद लाभला व त्या पुस्तकाच्या सर्व प्रति संपून बरेच दिवस झाले . सदर पुस्तकाची सुधारित आवृत्ती काढावी अशा अर्थाची पत्रे. मेल्स व तोंडी सूचना अनेक अधिकारी व कर्मचारी यांचेकडून  आल्या होत्या. परंतु इतर कामांमुळे व माझ्या  प्रकृती अस्वास्थामुळे पुस्तकाची  पुढील आवृत्ती  काढणे शक्य झाले नव्हते . मात्र आता  पुस्तकाची चौथी आवृत्ती यशदाने नुकतीच प्रसिध्द्व केली आहे.  सदर पुस्तकाची खालील वैशिष्ठ्ये आहेत.

१) दि. ३१-१०-२०१७ पर्यंत केलेल्या सुधारणासहित अद्यावत नियम व त्यावरील संक्षिप्त टीपा  व महत्वाचे न्यायालयीन निर्णय पुस्तकात  देण्यात आले आहेत.

२) पुस्तकात अद्यावत महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम १९७९ प्रथमच देण्यात आले आहेत.

३) " दोषारोपपत्र कसे तयार करावे"  या अत्यंत महत्वाच्या विषयाबाबत मार्गदर्शक सूचना असणारे स्वतंत्र प्रकरण अंतर्भूत  करण्यात आले आहे.

४) " प्राथमिक चौकशी " व "महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण " याबाबत सर्वकंष माहिती व्हावी म्हणू या विषयाबाबतचे संभाव्य प्रश्न व उत्तरे असणारी स्वतंत्र प्रकरणे अंतर्भूत करण्यात आली आहेत.

५) विभागीय चौकशी बाबतचे महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके पुस्तकात अंतर्भत करण्यात आली आहेत.

सर्व शासकीय तसेच शासनाची महामंडळे, राज्यातील  विद्यापीठे तसेच इतर संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी या सर्वांसाठी उपयुक्त  असलेल्या या पुस्तकांची किंमत रुपये  ३५० असली तरी हे पुस्तक  यशदामध्ये सवलतीच्या दरानं  म्हणजे फक्त  २१० रुपयास उपलब्ध आहे.

हे पुस्तक नेट बँकिंग द्वारे म्हणजे NEFT किंवा RTGS द्वारे पुस्तकाची किंमत रु. २१० अधिक टपाल खर्च रु. १०० म्हणजे एकूण रु. ३१० पाठविल्यास हे पुस्तक SPEED POST ने यशदाच्या प्रकाशन विभागातर्फे पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र पैसे NEFT अथवा RTGS पाठविल्यास  तसे  व आपला पत्ता ई मेलने प्रकाशन विभागाच्या yashdabooks@gmail.com या  address  वर  मेलने जरूर कळवावा   म्हणजे पुस्तक दिलेल्या पत्त्यावर पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.  पैसे  NEFT अथवा RTGS ने पाठविण्यासाठी यशदाच्या बँक अकाउंट संबंधी तपशील पुढे दिला आहे.

Name of Bank                IDBI

Name of A/C holder -    Director General, Yashvantrav Chavan                                               Academy Of Development Administration

Account Number-          062104000065663

IFSC Code-                    IBKL0000062

पैसे " डायरेक्टर जनरल ,यशदा " यांचे नांवे चेकने, अथवा  draft ने किंवा मनीऑर्डरने यशदाच्या पत्त्यावर पाठविल्यास देखील पुस्तक पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
  
अधिक माहितीसाठी यशदाच्या प्रकाशन विभागाशी  ०२०-२५६०८२६६ किंवा ०२०-२५६०८२३४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. 

18 comments:

 1. एखादा कर्मचारी निलंबित झाल्यानंतर त्यास पुन्हा सेवेत घेण्यात आल्यास संबंधीत कर्मचा-याचे वेतन कशे काढावे मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete
 2. I will buy this book at an earliest.

  ReplyDelete
 3. एखाद्या कआर्मचाऱ्याचे दोन लग्न झाले असतील व ते एकत्र राहत असतील कुटुंब निवृत्ती साठी पेंशन केस बनविण्यासाठी मार्गदर्शन व्हावे.

  ReplyDelete
 4. Online खरेदी करता नाही येणार का? Online खरेदी करता सुविधा द्यावी

  ReplyDelete
 5. Tin vetanvadh kayamswarupi thambavanyachi shiksha karta yete kay

  ReplyDelete
 6. महाराष्ट्र नागरी सेवा(शिस्त व अपील)नियम 1979चा नियम 5(4)

  ReplyDelete
 7. नमस्कार सर आपण विभागीय चौकशी संदर्भात मार्गदर्शन करीत आहात ते फार मोलाचे आहे त्याबद्दल आपले शतशः नमन!
  माझा pwamt.blogspot.in हा ब्लॉग असून त्यामध्ये मी आपल्या ब्लॉगची लिंक दिली आहे ज्यामुळे त्याचा सर्वांना फायदा होईल पुनश्च आपणास शतशः नमन!

  ReplyDelete
 8. sir mi class 4 karmachari aahe mi aajari aslyamule karyalyat upasthit navhto mazyavar vibhagiy chaukashi lavli aahe te yogy aahe ka

  ReplyDelete
 9. निलंबन विरुद्ध अपील कसे करावे

  ReplyDelete
 10. निलंबना विरुद्ध अपील करताना कोणते महत्वाचे मुद्दे विचारात घ्यावे संदीप 7506591290

  ReplyDelete
 11. 1979 नियम 3 व 1 व 2 या मध्ये शिक्षा काय आहेै

  ReplyDelete
 12. सर आपला मोबाईल नंबर हवा होता.

  ReplyDelete
 13. म.ना.से (शिक्षा व अपील )नियम १९७९ अन्वये विभागीय चौकशी केव्हा सुरु झाली असे मानण्यात येते. धन्यवाद सर.

  ReplyDelete
 14. yashdabooks@gmail.com
  Email not working mails are getting bounced

  I have paid Rs 310 on 13 December 2020

  ReplyDelete
 15. Sir my dad also died on 1 march 2011 on deputy engineer on drdo zilla parishad class 2 post already given to application for anukampa but they told me class 1 &2 anukampa not there not vaccines. But now gr change they give new application told your dad died left 10 years and take all benefits pension why are you apply now give me suggest sir my email id nitinchoudhari1000@gmail.com

  ReplyDelete
 16. सर,ट्रिब्युनल कोर्टात केस असतांना तात्पुरती पेन्शन मिळण्याकरिता कोणती कागदपत्रे लागतील

  ReplyDelete