आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

तात्पुरते निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतन धारकांसाठी गोड बातमी

विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे या व इतर कारणास्तव सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांना  तात्पुरते निवृत्तीवेतन ( Provisional pension) दिले जाते. वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर त्यांना मिळणारे तात्पुरतेसंबंधित  सुधारित केले जात नसे. मात्र प्रत्येक वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करतांना अशा प्रकरणात केंद्रीय कर्मचा-यांचे  तात्पुरते निवृत्तीवेतन सुधारित करण्यात येत असे. तेंव्हा याच धर्तीवर राज्यशासकीय कर्मचा-यांचे तात्पुरते निवृत्तीवेतन सुधारित करण्यात यावे अशी विनंती यशदाच्या मोफत सल्ला कक्षातर्फे वित्त विभागास करण्यात आली होती. या विनंतीचा सत्ता पाठपुरावा करण्याशासनाने नुकत्याच त आला, प्रधान सचिव , वित्त (लेख व कोषागारे) यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आनंदाची बातमी अशी की  मोफत सल्ला कक्षातर्फे करण्यात आलेली सूचना शासनाने मान्य करून , १ जानेवारी २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या व विविध कारणास्तव तात्पुरते निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांचे तात्पुरते निवृत्तीवेतन सातव्या आयोगाच्या शिफारशीनुसार म्हणजेच दि. २४ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार  सुधारित करण्यात यावे अशा तऱ्हेच्या सूचना शासनाने नुकत्याच निर्गमित केलेल्या दि. ८  जुलै २०१९ च्या शासन निर्णयात देण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णय " नुकतेच व महत्वाचे " महत्वाचे या शीर्षकाखाली शिक्षकाखाली अनुक्रमांक ३८ वर उपलब्ध आहे. या निर्णयामुळे तात्पुरते निवृत्तीवेतन  घेणा-या निवृत्तीवेतन धारकांना मोठा लाभ होणार आहे.

वर नमूद केलेल्या शासन निर्णयाची नोंद घेऊन संबंधित अधिका-यांनी तात्पुरते निवृत्तीवेतन  घेणा-या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे तात्पुरते निवृत्ती त्वरेने सुधारित करण्यात येईल असे पाहावे त्वरेने यावे जेणेकरून वयोवृद्ध सेवानिवृत्तिवेतन धारकांना लाभ होईल.