आजचा सुविचार ७ जानेवारी २०१८

बोलतांना शब्दाना धार नको, तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार देणारे शब्द मने जोडतात.

" Disciplinary Proceedings- Why Administrative Tribunals Interfere ? " हे पुस्तक आता या ब्लॉगवर उपलब्ध

Disciplinary Proceedings- Why Administrative Tribunal Interfere ? हे पुस्तक यशदाने प्रसिध्द्व केले होते. त्या पुस्तकाला शासकीय कर्मचा-यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला व पुस्तकाच्या सर्व प्रति संपून बरेच दिवस झाले. पुस्तकाची सुधारित आवृत्ती काढावी अशी मागणी अनेक शासकीय कर्मचारी या अधिकारी यांचेकडून करण्यात आली परंतु माझ्या प्रकृतीच्या करणामुळेव इतर कामाच्या व्यापामुळे  ते शक्य झाले नाही. परंतु या पुस्तकांत शिस्तभंगविषयक कारवाई या संदर्भातील राज्य घटनेतल्या कलम ३११ मधील तरतुदी, नैसर्गिक न्यायाची तत्वे, पुरेशी संधी, फौजदारी कार्यवाही व शिस्तभंगविषयक कारवाई , उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्णय याबातची माहिती असल्याने , पुस्तकाची सुधारित आवृत्ती काढता येत नसेल तर ते पुस्तक या ब्लॉगवर टाकावे  अशी सूचना  अनेक शासकीय कर्मचारी  यांचेकडून प्राप्त झाली होती . 

वर नमूद केलेली  सूचना विचारांत घेऊन Disciplinary Proceedings- Why Administrative Tribunal Interfere ? हे पुस्तक या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ब्लॉगवर शेवटी असलेल्या पुस्तकाच्या कव्हर फोटोवर क्लिक केल्यास या पुस्तकाचे   अवलोकन करता येईल.मात्र या पुस्तकात दिलेले महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्तव अपील) नियम १९७९, केंद्रीय कर्मचारी यांचेसाठी असलेले शिस्त व अपील नियम १९६५ तसेच प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा १९८५  यामधील तरतुदी पुस्तक संपादित करतेवेळी जशा होत्या तशा दिलेल्या आहेत. व त्या अद्यावत करण्यात आलेल्या नाहीत हे कृपया लक्षात ठेवावे.