आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...
पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.
कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

सौजन्य- सुविचार कोष

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी( जि.प.) यांना विमान प्रवास सवलत

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी

यांना तातडीच्या  शासकीय कामकाजासाठी,संबंधित

महसूल विभाग आयुक्तांच्या परवानगीने  मुंबई येथे

जाण्या येण्यासाठी ,वित्त विभागाच्या दि. 21-01-2012

च्या शासन निर्णयाद्वारे अनुद्नेय करण्यात आला आहे.

Bogus Caste Cerificate holder Can be Sacked- CAT

A person who obtains a job by submitting a false caste certificate neither has the right to continue in service, nor he deserves sympathy even if he has put in long years in the work, the Central Administrative Tribunal has held.

"If a person gets appointment on a false caste certificate which is already cancelled by the authorities, then such a person has no right to continue in service. Such a person needs no sympathy or equity from the court on the ground that he has worked for long years," CAT Members S Pandey and M Chibber said.

The tribunal passed the order on a petition filed by Shiv Kumar, a teacher of Kendriya Vidyalaya, Aligarh challenging his termination from service by the disciplinary authority without affording him an opportunity to defend himself and overlooking 14 years of service rendered by him.
-pti-

डिसेंबर 2011 मध्ये निर्गमित केलेले महत्वाचे शासकीय निर्णय व परिपत्रके

 डिसेंबर 2011 मध्ये निर्गमित केलेले महत्वाचे शासकीय निर्णय/ परिपत्रके

गेल्या महिन्यात  सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागांतर्फे निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे शासकीय  निर्णय व परिपत्रके  या ब्लॉगवर देण्याची सुरूवात या महिन्या पासून करीत आहे. आशा आहे की  ब्लॉगला भेंट देणा-याकडून या उपक्रमाचे स्वागतच होईल.

  डिसेंबर 2011 मध्ये निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे शासकीय निर्णय व परिपत्रके खालील प्रमाणे आहेत.

1)  लोकशाही दिनाची अंमलबजावणी--  जिल्हा पालकसचिवांची नेमणूक   ( साप्रवि, शा.ऩि.दि.8-12-2011)

 2)  मागासवर्गीय उमेदवाराना जातप्रमाणपत्राविना नियुक्ती /पदोन्नती (साप्रवि, शा. नि. दि. 12-12-2011)

3) वैद्यकिय प्रमाणपत्राशिवाय रजा-- द्यावयाची वार्षिक वेतन वाढ
  (वि.वि. शा. नि. दि. 26-12-2011

 4) दोन किंवा अधिक पदावरील नियुक्ती- अतिरिक्त/ विशेष वेतन
    (वि.वि.  शा. नि. 8-12-2011)

 5) प्रवास भत्ता व दॅनिक भत्त्यांच्या दरात सुधारणा 
     (वि.वि. शा. नि. दि. 27-12-2011)

  वर नमूद केलेले शासकीय निर्णय या ब्लॉगवर  " नुकतीच निर्गमित
  केलेली परिपत्रके व शासकीय निर्णय " या   सदरांखाली उपलब्ध आहेत.
 संबंधितानी जरूर तर ते  डाऊनलोड करून घ्यावेत.

 
   श्रीधर जोशी

नव्या वर्षाचा निर्धार

शासकीय कर्मचा-यांना विभागीय चौकशी संदर्भात उपयुक्त होईल  अशी माहिती देण्याचा मी काही दिवसापासून प्रयत्न करीत आहे.या माहितीचा खूप उपयोग होतो अशा अर्थाच्या मेल्स मला आल्या आहेत. तसेच अनेकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अशाच तर्हेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार .

शासनाची विविध विभागांतर्फे अनेक शासकीय निर्णय व परिपत्रके निर्गमित केली जातात.सर्वसाधारणपणे सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागातर्फे निर्गमित केले जाणारे शासकीय निर्णय व परिपत्रके सर्वांसाठी उपयुक्त असतात . त्यामुळे दर महिन्याच्या ५ तारखेला गेल्या महिन्यात निर्गमित केले गेलेले महत्वाचे शासकीय निर्णय व परिपत्रके या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्याचा मी निर्धार केला आहे.

शक्य झाल्यास विभागीय चौकशी संदर्भातील न्यायालयांचे अलीकडील महत्वाचे निर्णय देण्याचा माझा विचार आहे.बघू या कसे जमते ते.

नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा