आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

बिघडा बाळांनो बिघडा

शिवबांच्या राज्यांत
शिवबांचे नांव जपत
शिवबांचा वारसा सांगत
दारु गाळतात कुणी कुणी
अन्नाची नासाडी करून
गरीबाचा घास पळवून
अन् हाकारतात कोवळ्या कळ्यांना --
या बाळांनो या
फुकट पाजतो दारु ती प्या
बेधुंद होऊन नाचा
बिघडा बाळांनो बिघडा
उद्याचे आहांत तुम्ही मतदार
आमच्या राजभोगाचे
मावळ्यांनी नाही का आपली निष्ठा महाराजांच्या पदरांत टाकली
तुम्ही पण टाकाल तुमची मते आमच्याच पदरांत
खात्री आहे आम्हाला
रायरेश्वराच्या चरणी स्वराज्य-स्थापनेची शपथ घेणा-या शिवबांची शपथ
आमच्या राजसत्तेत तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही
अशा मद्यधुंद पार्ट्या
बिघडा बाळांनो बिघडा
तुमच्या बिघडण्यांतच दिसतो आम्हाला आमचा सुवर्णकाळ —
 
कवी सौ. लीना मेहेंदळे ,भा.प्र.से.(नि)

विजयादशमीचा निर्धार
 विजयादशमीचा निर्धार , गाडून टाकू भ्रष्टाचार
 

काय करायचे ते आत्ताच करा

कल करेसो आज , आज करेसो अब

पलमे प्रलय होगा फिर करेगा कब

भूतकाळ आपल्या हातून गेलेला असतो ..भविष्यकाळावर आपले नियंत्रण नसते. वर्तमानकाळ मात्र आपल्या

हातात असतो. म्हणू काय करायचे ते आत्ताच करावयास हवे.

सप्टेंबर २०१२ मध्ये निर्गमित केलेलं खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

सप्टेंबर २०१२ मध्ये निर्गमित केलेलं खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या ब्लॉगवर " नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखाली अनुक्रमांक ५१ ते ५९ वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ती जरूर तर डाउनलोड करून घ्यावीत .
१) शासकीय इमारतीसाठी राखीव भूखंड- सूची करणे , महसूल व वनविभाग परिपत्रक दि. १० सप्टेंबर २०१२
२) महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०१२ , ग्रामविकास विभाग परिपत्रक दि. १२-०९-२०१२
३) सेवाप्रवेशोत्तर पशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट, सामान्य प्रशासन विभाग , परिपत्रक दि. १३-०९-२०१२
४) निवासी इमारतीतील वाणिज्य वापरास अकृषिक परवानगीतून सूट देणेबाबत , महसूल विभाग परिपत्रक दि. १३-०९-२०१२
५) पंचायत राज अभियान, उत्कृष्ट जिल्हा परिषद , पं.समिती व ग्रामपंचायत यांना पारितोषिके ,परिपत्रक दि.१५-०९-२०१२
६) राज्य क्रीडा धोरणाची अमलबजावणी ,शिफार्शिव्रील कार्यवाही , तज्ञ समितीची नेमणूक, शासन निर्णय दि. २१-०९-२०१२
७) इ-गव्हर्नन्स प्रकल्प , सल्ला देण्यासाठी शासनाने निवडलेल्या संस्था, सामान्य प्रशासन विभाग , शा. नि. दि. २१-०९-२०१२
८) लोकशाहीदिन अमलबजावणी - एकत्रित आदेश , सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि. २६-०९-२०१२
९) विद्यार्थी , शिक्षक/ शिक्षक यांना जून २०१३ पर्यंत आधार कार्ड देणेबाबत, शालेय शिक्षण विभाग शा. नि. दि.२७-०९-२०१२

"विचार बदला, आयुष्य बदलेल

आपण आपल्याच जखमांना नको तितके कुरवाळत बसतो. दुस-यांची दु:खं आपल्याला दिसत नाहीत. आपण घोड्यासारखे ढापणं लावून आजूबाजूची दृष्टी बंद करून टाकतो. आपल्याला आपलच दु;ख पहाडासारखे मोठं वाटते. इतरांचे सगळ नगण्य, क्षुल्लक.. आपण आपल्या जखमा भिंगातून बघत असतो. त्याचे कोडकौतुक देखील करतो. इतरांकडून सहानुभूती कमवायची आणि प्राप्त परिस्थितीची किंवा ती दूर करण्याविषयी आपली जबाबदारी झटकून टाकायची, हे यातून अलगद साधून घेतो
  
"विचार बदला, आयुष्य बदलेल " या डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या पुस्तकातून

मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण - संत तुकाराम

आपले मन प्रसन्न असेल तरच कोणतेही काम करण्यास आनंद वाटतो.पण आपल्या मनात सदैव चिंता, विवंचना असतात. मनावर ताण असतो. असा माणूस योग्य त्या तर्हने काम करू शकत नाही. चिंतेची चिंता करत बसण्यापेक्षा आनंदी राहा व मन प्रसन्ना ठेवा. तुम्ही तुमची कामे निश्चित वेळेवर यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.