आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

'आनंद' आणि 'समाधान'

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठीकोणावरतरी, ‘कशावरतरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर-कुणाच्या न बोलण्यावर.
खरं तर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून...आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत -पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !

यश व अपयश

यश व अपयश हे एकाच रस्त्याला फुटलेले दोन फाटे आहेत . मात्र ते एकमेकापासून विरुध्द दिशेला जाणारे आहेत .प्रत्येकाला यश हवे असते . मात्र त्यासाठी ,ध्यास ,चिंतन, प्रयत्न या सर्वच गोष्टी आवश्यक आहेत .परंतु त्याशिवाय दैव अनुकूल हवे. दैवाचा भाग छोटा असला तरी तो गरजेचा असतो.

तर नाही तर दिवा बना

आकाशातील तारे होणे तुम्हाला शक्य नसेल , परंतु घरातील दिवा बनून घर प्रकाशित करणे तुम्हाला शक्य आहे . जगात मोठेपणा मिळविणे सर्वांनाच शक्य होणार नाही. तरी आपल्या चांगल्या वागणुकीमुळे घरातल्या माणसाना सुख व आनंद निश्चित देता येईल .


 

दिनविशेष

 दिनविशेष


 मराठा चेंबरची स्थापना (१९११)
 
 महाराष्ट्रातील पहिला तारांगणदर्शक (१९५४)
  
 पद्मश्री कवी सुधांशू यांचे निधन (२००६)

श्री .प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली

आज प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिन. त्यांनी विविध क्षेत्रात मोठे कार्य करून आपला ठसा उमटविला.समाजसुधारक, इतिहासकार, उत्तम वक्ते , झुंजार पत्रकार म्हणून ते प्रसिध्द होते. महात्मा फुले, गोपालकृष्ण आगरकर, शाहू महाराज हे त्यांची दैवते व स्फूर्तिस्थाने होती. सामाजिक व धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांनी चालविलेल्या "प्रबोधन' या मासिकामुळे ते प्रबोधनकार झाले.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांना तुरुंगवास घडला . स्वराज्याचा खून , माझी जीवनगाथा , छत्रपती आणि रंगो बापुजी, इत्यादी पुस्तके लिहिली. त्यांचे लेखन कुमारांसाठी खूप प्रेरणादायी होते. दि, २० नोव्हेंबर १९७३ रोजी त्यांचे निधन झाले.
थोर समाजसुधारक व उत्तम वक्ते श्री .प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली

कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळवादापासून स्त्रियांना संरक्षण बिल 2010

कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळवादापासून स्त्रियांना संरक्षण बिल 2010

कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळवादापासून स्त्रियांना संरक्षण मिळावे  म्हणुन वरील बिल लोकसभेने नुकतेच संमत केले.आता सदर बिल राज्यसभेत मंजूर झाल्यावर  व त्यानंतर त्यास राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

सदर बिल कर्मचारी बंधु व भगिनींसाठी या   ब्लॉगवर "महत्वाचे संदर्भ" या शिर्षकाखाली उपलब्ध आहे. संबंधितांनी ते जरूर तर डाऊनलोड करून घ्यावे.
 

ऑगस्ट २०१२ मध्ये निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

ऑगस्ट २०१२ मध्ये निर्गमित झालेले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके, "नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय" या शीर्षकाखाली या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. जरूर तर डाउनलोड करून घ्यावेत ..

१) म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो .अंतर्गत कामाच्च्या तपासणीचे माप दंड, नियोजन विभाग, शा.नि ३-८-२०१२

२) शेतकरी जनता अपघात विमा योजना २०१२ -२०१३, शा.नि.९-०८-२०१२

३) ग्रंथपाल यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ करणेबाबत , शा .नि. २२-०८-२०१२

४) कंत्राटी तत्वावरील कर्मचा-यांना प्रवास भत्ता व दैनिक भत्ता देणे बाबत शा. नि. २१-०८-२०१२

५) इंजिन चालकांची वेतनश्रेणी -सुधारित नोंद , वित्त विभाग शुद्धिपत्रक , दि. २१-०८-२०१२

६) शालेय पोषण आहार- सुधारित दर ,शा.नि. १७-०८-२०१२

७) सेवा अभिलेखांची पुनर्बांधणी- गृह विभाग परिपत्रक ,दि. २९-०८-२०१२

No change in Retirement Age of State Government employees

The demand of various Employees unions for raising retirement age of Maharashtra State Government from 58 to 60 Years was rejected by the State Government.
This was stated by Chief minister Mr. Prithviraj Chavan approved the department’s stand.
While unions had argued that the extension was in line with the Centre’s policy, the state said such a move would hurt job flow in the public sector. The unions had further argued that states like Goa, Jharkhand, West Bengal and Karnataka had already raised the retirement age to 60 but the department reasoned that states like Gujarat and Andhra Pradesh had retained the retirement age of 58.
Increasing the retirement age would also delay fresh postings for promoted employees, the department said. It claimed that it had received applications from employees opposing the demand. A move to enhance the retirement age would have enabled the government to defer payments of lump sum retirement benefits by two years.
 
Courtesy- G Connect