आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

अतिरिक्त जिल्हाधिका-यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती

राज्यातील खाली नमूद केलेल्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांना भारतीय प्रशासन  सेवेत बढती  प्रशासन देण्यात आली आहे. त्यांना भारतीय प्रशासन सेवेचे सदस्य करण्यात आल्याची अधिसूचना केंद्रशासनाने नुकतीच काढली आहे.

१)  पी. के. ठुबे .

२) टी. जी. कासार 

३) शेखर गायकवाड 

४) व्ही. एन. काळम 

५) एस. एम. काकानी .

६)  के. डी. निंबाळकर .

७)  एस.एन. भणगे .

८)  ए.एम.कवडे 

९)  एस.एम.चन्ने.

१०) ए.बी.मिसाळ 

                                   सर्वांचे हार्दिक अभिनंदन 

----------------आवाहन ---------------


मी गेल्या काही वर्षांपासून " विभागीय चौकशी " या विषयांवर मोफत मार्गदर्शन करत आहे . " मला बचाव सहाय्यक नेमावयाचा आहे , तेव्हां मला बचाव सहाय्यकाचे नाव सांगा " अशी विनंती माझ्याकडे येणारे कर्मचारी माझ्याकडे करतात . माझ्याकडे बचाव सहाय्यक म्हणून काम करणा-या कर्मचा-यांची यादी नाही. तंव्हा बचाव सहाय्यक म्हणून काम करणा-या कर्मचा-यंची यादी तयार करून ती ब्लॉगवर देण्याचा माझा मानस आहे. तेव्हां बचाव सहाय्यक म्हणून काम करणा-या केंद्रीय व राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी खालील माहिती माझ्याकडे पोस्टाने अथवा इमेलद्वारे पाठवावी ही विनंती .

१) संपूर्ण नांव व जन्मतारीख
२) शिक्षण
३) सेवेत आहात की सेवानिवृत्त
४) शासकीय सेवेत सांभाळलेले पद
५) बचाव सहाय्यक म्हणून किती वर्षांचा अनुभव
६) पत्रव्यवहाराचा पत्ता व फोन नंबर

वरील माहिती माझ्याकडे खालील पत्त्यावर अथवा इमेलद्वारे पाठवावी .
श्रीधर दत्तात्रय जोशी , भाप्रसे (नि)
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
राजभवन आवार , बाणेर रोड , पुणे ४११००७
इमेल - shridharji@hotmail.com

निवृत्तीवेतनधारकांसाठी यशदामध्ये मोफत मार्गदर्शन

निवृत्तीवेतनधारकांसाठी यशदामध्ये मोफत मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे दि. 7 जानेवारी 2013 पासून आठवड्यांतील दर
सोमवार व मंगळवारी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत ‘निवृत्तीवेतनधारकांचे वेतन
निश्चिती व निवृत्तीवेतन संदर्भातील अडचणी व प्रश्नासंदर्भात मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे माजी उपाध्यक्ष श्रीधर जोशी, भाप्रसे (नि), प्रमोद रेंगे (निवृत्त लेखा अधिकारी)
आणि वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मार्गदर्शन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या निवृत्तीवेतनधारकांनी यशदामध्ये येण्याची तारीख व वेळ निश्चित करून घेऊनच
यावे व त्यासाठी 25608000 किंवा 25608163 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. येताना त्यांचेकडे
असलेली निवृत्तीवेतनासंबंधीची कागदपत्रे घेऊन यावीत, असे आवाहन यशदाच्या परिपत्रकान्वये करण्यात आले आहे.

शासनाने डिसेम्बर २०१२ मध्ये निर्गमित केलेली " महत्वाची नवी परिपत्रके व शासन निर्णय"

शासनाने डिसेम्बर २०१२ मध्ये निर्गमित केलेली खालील महत्वाची परिपत्रके , शासन निर्णय व अधिसूचना महत्वाची  नवी परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखाली या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत .


१) सार्वजनिक सुट्ट्या- २०१३, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना, दि. ५-१२-२०१२

२) यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजना २०१२-१३  ग्रामविकास व जलसंधारण विभाग परिपत्रक दि. ७-१२-२०१२

३) आदिवासी व नक्षल्ग्रस्त विभागातील पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाहीकरणेविषयी, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक , दि. ७-१२-२०१२

४) जिल्हा ग्राहक परिषदेची पुनर्रचना ,अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग, अधिसूचना दि. १०-१२-२०१२

५) अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवड श्रेणीतील पदे 20 ट्क्के ऐवजी 33 टक्के रुपांतरीत करणेबाबत ,महसूल व वन विभाग शासन निर्णय दि. १२-१२-२०१२

६) लोकशाही दिनाची अंमलबजावणी- जिल्हा पालकसचिवांच्या नेमणुका ,सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. १४-२-२०१२


वरील शासन निर्णय ,परिपत्रके व अधिसूचना जरूर तर डाउनलोड करून घ्यावीत .