आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

विभागीय चौकशी - रोजनामा किंवा डेली ऑर्डर शीट

विभागीय चौकशीचे वेळी सुनावणी च्या प्रत्येक दिवशी रोजनामा ( Daily order Sheet ) लिहिणे  आवश्यक असते.सदर रोजनाम्यात सुनावणीचे वेळी घडलेल्या सर्व गोष्टींची व चौकशीचे संदर्भात केल्या कार्यवाहीची नोंद करावयाची असते.अपचारी कर्मचा-याला  नियमानुसार त्याची बाजू मांडण्याची संधी दिली आहे किंवा नाही याची खात्री न्यायालयास सदर नोंदीवरून करता येते. रोजनामा ठेवला नसल्यास व इतर कोणताही पुरावा नसल्यास कर्माचा-यांस योग्य ती संधी दिली नाही असा निष्कर्ष न्यायालय काढू शकते.मात्र रोजनामा लिहिलेला नसल्यास चौकशीचे वेळी नेमके काय घडले याबाबत  चौकशी अधिका-याने दिलेला जवाब संपूर्णपणे ग्राह्य धरला जाईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने Union of India v/s T.R.Varma या प्रकरणांत दिलेला आहे. सदर निकालपत्र  या ब्लॉगवरील " शिस्तभंग कार्यवाही- महत्वाचे न्यायालयीन निर्णय" या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक ३५ वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिस्तभंग विषयक कार्यवाही संदर्भातील सादरीकरणे

शिस्तभंग विषयक कार्यवाही कशी केली जाते , महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) व महारष्ट्र नागरी सेवा(शिस्त व अपील) नियम १९७९ व अनुषंगिक विषयावर बोलण्यासाठी मला यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी तसेच केंद्र शासनाच्या विविध प्रशिक्षण संस्थामध्ये पाचारण केले जाते.त्यावेळी  Power Point च्या मदतीने  सादरीकरण केले जाते.  शिस्तभंग विषयक कार्यवाही संदर्भातील विविध मुद्दे, तसेच   प्रशिक्षणार्थी यांना ज्ञान अवगत झाले किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी प्रश्नोत्तरांचा अंतर्भाव सदर सादरीकरणात केलेला असतो. सदर सादरीकरणाचा मला व प्रशिक्षणार्थी यांना  खूप फायदा होतो असा अनुभव आहे. सादरीकरणाच्या प्रती प्रशिक्षणार्थी यांच्या विनंतीवरून त्यांना दिल्या जातात.
राज्यशासनाचे कर्मचारी तसेच केंद्रीय कर्मचा-यांना या विषयाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थामध्ये अध्यापक वर्ग असतो .तसेच प्रशिक्षण देण्यासाठी Guest Faculty आमंत्रित केली जाते. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या सर्वच कर्मचा-यांना सदर सादरीकरणें  उपलब्ध व्हावीत म्हणून ही सादरीकरणे या ब्लॉगवर "शिस्तभंगविषयक कार्यवाही - सादरीकरणे" या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत.कांहीं सादरीकरणे मराठीत तर कांहीं सादरी  इंग्लिश मध्ये आहेत. इच्छा असेल त्यांना ती डाउनलोड करून घेता येतील.