आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण - संभाव्य शंका व उत्तरे

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण


राज्याच्या नागरी सेवेतील व नागरी पदावर काम करणा-या कर्मचा-यांचे सेवाविषयक वाद व तक्रारींचे बाबतीत त्वरेने न्यायनिवाडे व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकारणाची स्थापना करण्यात आली आहे.सदर न्यायाधिकरणाची संरचना व कार्यपध्दती बाबत कर्मचा-यांना अनेक शंका असतात. म्हणून प्रशासकीय न्यायाधिकरणाबाबत वेळोवेळी ळी विचारले जाणारे प्रश्न,शंका व त्यांची उत्तरे " महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,"संभाव्य प्रश्न व उत्तरे" या शीर्षकाखाली या ब्लॉगवर-देण्यात आली आहेत. ती सर्व कर्मचा-यांना निश्चित उपयुक्त ठरतील अशी खात्री आहे. सदर प्रश्नोत्तरे जरूर तर डाउनलोड करून घेता येतील.

मी संपादित केलेले " महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) अपील नियम" या पुस्तकाची चौथी आवृत्ती यशदा तर्फे लवकरच प्रकाशित होणार आहे. सदर पुस्तकात देखील ' महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण ,संभाव्य प्रश्न व उत्तरे" हे शीर्षक असलेले प्रकरण अंतर्भूत केले आहे.

लिपिक व टंकलेखक आणि वाहन चालक पदासाठी सेवाप्रवेश नियम

महाराष्ट्र शासनाने  बृहन्मुंबई बाहेरील कार्यालयातील लिपिक व टंकलेखक या पदासाठी सेवाप्रवेश नियम केले असून ते ६जुन २०१७ च्या राजपत्रात प्रसिध्द केले आहेत.

त्याच प्रमाणे राज्यातील विविध कार्यालयातील वाहन चालक पदासाठीचे सेवा प्रवेश नियम २ मार्च २०१७ च्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

वरील दोन्ही सेवाप्रवेश नियम या ब्लॉगवरील  "नुकतेच व महत्वाचे या शीर्षकाखालील यादीतील अनुक्रमांक ३४व ३५ वर उपलब्ध करून ददेण्यात  आले आहेत. संबंधितांनी ते जरूर डाऊनलोड करून घ्यावेत. ते त्यांना निश्चित उपयुक्त ठरतील.

१ जुलै २०१७ पर्यंत सुधारित महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व  अपील) नियम १९७९ मध्ये  शासनाने २०१६ मध्ये महत्वाच्या दुरुस्त्या /सुधारणा केल्या .अद्याप पर्यंत केलेल्या सर्व दुरुस्त्या अंतर्भूत करून दि. १ जुलै २०१७ पर्यंत सुधारित महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त  अपील) नियम १९७९ या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्व संबंधितांना  सदर नियम  जरूर तर डाउनलोड करून घेता येतील.