आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

निलंबित कर्मचारी आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती करण्यासंदर्भात  शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन)  नियम २००९ केले असून ते  दि.२२ एप्रिल २००९ च्या अधिसूचने द्वारे प्रसिध्द करण्यात आले आहेत.या विषया संदर्भात  शासनाने  दि. २९एप्रिल २००९ च्या परिपत्रक अन्वये  सविस्तर सूचना दिल्या आहेत.निलंबित कर्मचा-याचे  सुधारित वेतन कसे निश्चित करावे या बाबत अनेकांच्या मनात शंका असल्याचे माझ्या  लक्षात  आले आहे.म्हणून अधिसूचना व परिपत्रकाचा अभ्यास करून त्या  सं बं धात खालील खुलासा देत आहे.

१)  जे कर्मचारी १-१-२००६ रोजी निलंबित होते  व अजून निलंबित आहेत ,त्यांचे सुधारित वेतन संरचनेतील वेतन त्यांच्या विरुध्द सुरु असलेल्या शिस्तभंग विषयक कार्यवाही वरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.( संदर्भ : नियम ७ खालील टीप ) थोडक्यात अशा कर्मचा-यांच्या बाबतीत सुधारित वेतन निश्चिती करता येणार नाही.त्यामुळे त्यांना सध्याच्या दरानेच निर्वाह भत्ता दिला जाईल.
२)  जे कर्मचारी १-१-२००६ रोजी निलंबित होते परंतु त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी  पूर्ण होऊन त्याचे निलंबन मागे घेऊन त्यांची सेवेत पुनर्स्थापना करण्यातआली आहे अशा कर्मचा-यांच्या बाबतीत ,विभागीय चौकशीचा व निलंबन काळ कसा निश्चित  केला आहे हे विचारात घेऊन सुधारित वेतन निश्चिती करावी लागेल.
३) जे कर्मचारी १-१-२००६ रोजी सेवेत होते व त्यानंतर निलंबित झाले त्यांच्या बाबतीत १-१-२००६ रोजीचे सुधारित वेतन निश्चित करावे लागेल. तसेच सुधारित वेतन लक्षात घेऊन त्यांना १-१-२००६ ते निलंबनाची  तारीख या काळाची थकबाकी देय राहील.त्याचप्रमाणे सुधारित वेतन लक्षात घेऊन निर्वाह भत्त्याची रक्कम निश्चित करून कर्मचा-यास देय राहील.

वरील विषयासंदर्भात काही शंका असल्यास मला  shridharji@hotmail.com  या पत्त्यावर पाठवाव्यात.

6 comments:

  1. सर मी प्राथमिक शिक्षक आहे. माझ्यावर फोजदारी गुन्हा दाखल झाल्या मुळे मला 4/9/2017 रोजी निलंबित केले होते परंतु ज्या संस्थेवर मी कार्यरत होतो त्या संस्थेनी माझे निलंबन दि.6/2/2018 रोजी परत घेतले आहे.आणि निलंबन परत घेतल्याचा प्रस्ताव देखील समाज कल्याण कार्यालयास सादर केला आहे .
    सर माझा मुख्य प्रश्न म्हणजे निलंबन वापस घेतल्या नंतर विभागीय चोकशी लागू असते का??? असते तर चोकशिचा कालावधी किती दिवसाचा असतो ??? आणि चोकशी दरम्यान किंवा निलंबन कालावधी 6 महिने पूर्ण झाल्यानंतर वेतन कशा प्रकारे अदा केले जाते

    ReplyDelete

    ReplyDelete
  2. सर मी प्राथमिक शिक्षक आहे. माझ्यावर फोजदारी गुन्हा दाखल झाल्या मुळे मला 4/9/2017 रोजी निलंबित केले होते परंतु ज्या संस्थेवर मी कार्यरत होतो त्या संस्थेनी माझे निलंबन दि.6/2/2018 रोजी परत घेतले आहे.आणि निलंबन परत घेतल्याचा प्रस्ताव देखील समाज कल्याण कार्यालयास सादर केला आहे .
    सर माझा मुख्य प्रश्न म्हणजे निलंबन वापस घेतल्या नंतर विभागीय चोकशी लागू असते का??? असते तर चोकशिचा कालावधी किती दिवसाचा असतो ??? आणि चोकशी दरम्यान किंवा निलंबन कालावधी 6 महिने पूर्ण झाल्यानंतर वेतन कशा प्रकारे अदा केले

    ReplyDelete
  3. सर मी प्राथमिक शिक्षक आहे.मी सन२०१६ मध्ये निलंबित ह़ोतो.७ वे वेतन आयोग लागू आहे का?

    ReplyDelete
  4. Sir mi patsastha madhe karyrat ahe pan Mala nilmban kele ani arda payment lagu ahe he barobar ahe ka ani sarv choukashi houn sudha ajun paryent nirnay dila Nahi ahe

    ReplyDelete
  5. July 2013 मध्ये मी रिटायर झालो. गेल्या 6 वर्षात माझा निलंबन कालावधी नियमित करण्यात आला नाही. आता मला नोटीस देवून नियमित करता येणार नाही असे कळविले आहे. निवृत्तीनंतर 6 वर्षात काहीही कळविले नसताना आतां निलंबन कालावधी नियमित न करण्याचा निर्णय घेता येईल काय?

    ReplyDelete
  6. निलंबन कालावधी 90 दिवसानंतर 75% वेतन मिळावे या बाबत काही माहिती नियम परिपत्रक असल्यास कळवावे
    patilros101@gmail.com

    ReplyDelete