आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

पुरवणी दोषारोप पत्र

अकोल्याचे श्री जैन  यांनी मला मेल पाठवून खालील
 प्रश्न विचारला आहे.
प्रश्न :  अपचारी कर्मचा-याला दोषारोप पत्र बजावले आहे.
       आता त्यात नवीन दोषारोप  टाकता येतील काय?
       वरील प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे आहे.
 
उत्तर: पूर्वीच्या दोषारोपपत्रात नवीन दोषारोप न टाकता
      पुरवणी दोषारोप पत्र तयार करावे,त्याबरोबर विवरणपत्र     
      (statement of allegations )जरूर जोडावे.तसेच नवीन
     दोषारोप सिद्ध करण्यासाठी नवीन कागदपत्रे व नवीन
    साक्षीदार
  असतील तर त्यांची यादी देखील जोडावी.
    नवीन कागदपत्रे व  नवीन साक्षीदार नसतील ,तर
    अपचारी कर्मचा-यास ज्या
पत्रासोबत(मेमोसोबत )
    पुरवणी दोषारोपत्र पाठविले जाईल,  त्या पत्रात ही
    बाब नमूद करावी  व पुरवणी दोषारोपपत्रात नमूद

    केलेले  दोषारोप ,मूळ दोषारोपपत्रासोबत  दिलेल्या
   कागदपत्रांच्या व साक्षीदारांच्या यादीत नमूद केलेल्या
   कागद पत्रांच्या व साक्षीदारांच्या साहय्याने सिद्ध केले
  जातील हे  देखील स्पष्ट करावे.
  वरील उत्तर श्री. जैन यांना कळविण्यात आले आहे.

1 comment:

  1. नमस्कार सर,
    (बँक ऑफ बरोडा) बँक कर्मचारी यांच्या विरुद्ध गैरवर्तणूक या साठी आपण विभागीय चौकशी दाखल करू शकतो का? हो तर ती कशा स्वरुपात कोठे व खर्च किती येतो यासाठी?

    ReplyDelete