आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

आज 27 फेब्रुवारी-जागतिक मराठी भाषा दिन

 आमुच्या मनामनात दंगते मराठी

 आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी

 कविवर्य सुरेश भट

 जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चाणक्य नीती 9 : जिथे असतील या 5 गोष्टी तिथे असावे आपले घर


आपण कशा ठिकाणी आपले निवास किंवा घर करावे याबद्दल आचार्य चाणक्य यांनी 5 गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या ठिकाणी या 5 गोष्टी सहजतेने उपलब्ध असतील तिथे निवास करणे श्रेष्ठ होय. अशा ठिकाणी राहणारा माणूस हा सदैव सुखी असतो.

आचार्य चाणक्य म्हणतात,

धनिक: श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचम:।

पंच यत्र न विद्यन्ते तत्र दिवसं वसेत्।।

या संस्कृत श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. ज्या ठिकाणी श्रीमंत लोक राहतात तिथे व्यवसायात वृद्धी होते. श्रीमंत लोकांच्या जवळपास राहणा-या लोकांनाही रोजगार मिळण्याची शक्यता वाढते. ज्या ठिकाणी ज्ञानी, वेद जाणणारी व्यक्ती असेल तिथे राहिल्याने धर्म ज्ञानाची प्राप्ती होते. आपण पापाचरणापासून दूर राहू शकतो. जिथे राजा किंवा शासकीय व्यवस्थेशी संबंधित व्यक्तींचे वास्तव्य असेल तिथे राहिल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळतो. जिथून नदी वाहते त्या ठिकाणी राहिल्याने भरपूर पाणी उपलब्ध होते. निसर्गाकडून अनेक गोष्टी मिळतात. पाचवी गोष्ट म्हणजे वैद्य अर्थात डॉक्टरांची उपलब्धता. आपल्या राहण्याच्या ठिकाणी जवळपास डॉक्टर असल्यास आजारांवर त्वरीत उपचार करणे शक्य होते.

आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले हे सूत्र संदर्भ बदलले असले तरी आजही प्रासंगिक वाटते. या श्लोकामागील अर्थ ध्यानात घेतल्यास आजही हा श्लोक मार्गदर्शक आहे.

सौजन्य-divyamarathi.com

चाणक्य नीती


आपल्या सवयी, हाव भाव आणि स्वभाव यावरूनच आपले घर, नातेवाईक आणि समाजातील स्थान ठरत असते. काही लोक असे असतात की ते घरी असू द्या की ऑफिसात, मित्रांमध्ये असू द्या की नातेवाईकांत, त्यांना सर्वत्र मानसन्मान मिळते. काही लोकांना मात्र सतत अपमान सहन करावा लागतो. आपल्याशी लोकांनी अपमानास्पदरीत्या वागवं, असे कोणालाही वाटत नसते.

घर आणि समाजात आपल्याला मानसन्मान पाहिजे असेल तर आपली वर्तणूक सगळ्यांशी चांगली पाहिजे. ध्यानात ठेवा की कोणत्याही माणसाबद्दल बोलताना चुकूनही काही अपमानास्पद किंवा कटू शब्द बोलू नका. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार फुलांचा सुगंध केवळ वा-याच्या दिशेनेच दरवळतो, तर चांगल्या माणसाच्या चांगुलपणाचा सुगंध हा सर्व दिशांत दरवळतो.

माणसातील चांगुलपणच त्याला सर्व ठिकाणी घर, नातेवाईक, समाज आणि मित्रांत आदर सन्मान मिळवून देते. जो माणूस सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो त्याच्याविषयी सर्वांनाच आदर वाटू लागतो. सर्वांच्या कल्याणासाठी काम करणा-याला विशेष स्थान मिळते.

जो माणूस स्वतच्या स्वार्थासाठी दुस-यांना त्रास देतो, राष्टÑहिताचे काम करत नाही, सतत वाईटाच्या संगतीत राहतो, त्याला मान सन्मान मिळणे शक्य नाही. त्यामुळे आपण आपल्या सवयी, स्वभाव यांची घडण अशा रीतीने केली पाहिजे की ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही.

चाण्क्य नीती

शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात, ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दु:ख होते, मनातील दु:ख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा-बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये.
कधी-कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दांत काहीही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. चाणक्य म्हणतात की, तुम्हालाही अपमान सोसावे लागले असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका.
या सा-या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटांत येऊ शकू. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगले.