आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

चाणक्य नीती 9 : जिथे असतील या 5 गोष्टी तिथे असावे आपले घर


आपण कशा ठिकाणी आपले निवास किंवा घर करावे याबद्दल आचार्य चाणक्य यांनी 5 गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या ठिकाणी या 5 गोष्टी सहजतेने उपलब्ध असतील तिथे निवास करणे श्रेष्ठ होय. अशा ठिकाणी राहणारा माणूस हा सदैव सुखी असतो.

आचार्य चाणक्य म्हणतात,

धनिक: श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचम:।

पंच यत्र न विद्यन्ते तत्र दिवसं वसेत्।।

या संस्कृत श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. ज्या ठिकाणी श्रीमंत लोक राहतात तिथे व्यवसायात वृद्धी होते. श्रीमंत लोकांच्या जवळपास राहणा-या लोकांनाही रोजगार मिळण्याची शक्यता वाढते. ज्या ठिकाणी ज्ञानी, वेद जाणणारी व्यक्ती असेल तिथे राहिल्याने धर्म ज्ञानाची प्राप्ती होते. आपण पापाचरणापासून दूर राहू शकतो. जिथे राजा किंवा शासकीय व्यवस्थेशी संबंधित व्यक्तींचे वास्तव्य असेल तिथे राहिल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळतो. जिथून नदी वाहते त्या ठिकाणी राहिल्याने भरपूर पाणी उपलब्ध होते. निसर्गाकडून अनेक गोष्टी मिळतात. पाचवी गोष्ट म्हणजे वैद्य अर्थात डॉक्टरांची उपलब्धता. आपल्या राहण्याच्या ठिकाणी जवळपास डॉक्टर असल्यास आजारांवर त्वरीत उपचार करणे शक्य होते.

आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले हे सूत्र संदर्भ बदलले असले तरी आजही प्रासंगिक वाटते. या श्लोकामागील अर्थ ध्यानात घेतल्यास आजही हा श्लोक मार्गदर्शक आहे.

सौजन्य-divyamarathi.com

No comments:

Post a Comment