आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

सेवानिवृत्तीनंतर देखील चुकीने नाकारलेल्या पदोन्नतीचे सर्व फायदे मिळू शकतात


सेवेत असताना कर्मचा-यास नियमानुसार देय असलेली पदोन्नती नाकारली गेली असेल तरी  सेवानिवृत्त  कर्मचा-यास नोशनल  पदोन्नती देऊन सर्व आर्थिक लाभ देण्यात यावेत असा केरळा न्यायालयाने,  सरकारी मदत मिळणा-या एडाकोची,  येथील कॉलेजचे कर्मचारी श्री. जोसेफ जॉन यांचे प्रकरणात नुकताच दिला आहे.

जोसेफ सेवेत असताना त्यांना  देय असलेली  "ज्येष्ठ अधिक्षक " या पदावरील पदोन्नती चुकीने नाकारण्यात आली होती. त्या निर्णयाविरुध्द त्यांनी  उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांनी केलेल्या रीट पिटीशन चा निकाल लागण्यापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. जोसेफ हे पदोन्नतीस पात्र  असून देखील त्यांना पदोन्नती चुकीने नाकारली असल्याने , ते सेवानिवृत्त झाले असले तरी  त्यांना नोशनल पदोन्नती देऊन त्यांना सर्व आर्थिक लाभ देण्यात यावेत असा उच्च न्यायालयाने निर्णय दिला .

No comments:

Post a Comment