भ्रष्टाचाराच्या आरोपावरून श्री. जैन या महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेतील अधिका-यास मुंबई येथील सेशन कोर्टाने ५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली . ४ दिवसापूर्वी ठाण्यातील मुंब्रा भागातील अनधिकृत इमारत कोसळून सुमारे ७५ लोकांचा मृत्यू झाला . अनधिकृत इमारत बांधण्यासाठी लोकनियुक्त पुढारी तसेच उपायुक्त दर्जाचे अधिका-याने मोठ्या प्रमाणात लांच घेतली होती असे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे
भ्रष्टाचारामुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे . राष्ट्राचा विकास खुंटला आहे .
भ्रष्टाचाराचा राक्षस गाडून टाकण्याची शपथ गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी घेऊ या व ती प्रत्यक्षात येईल यासाठी सतत प्रयत्नशील राहू या .
गुढी पाडव्याचा सर्वाना हार्दिक शुभेच्छा व भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यात आपणा सर्वांस यश मिळो ही प्रार्थना
No comments:
Post a Comment