राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-याना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ ऑक्टोबरपासून ७ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. आता १ ऑक्टोबर पासून सुधारातील वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील ( pay in the pay band plus gradepay ) महागाई भत्त्याचा दर ५१% वरून ५८ टक्के करण्यात आला आहे. सदर रक्कम रोखीत मिळणार आहे.या संदर्भातील शासन निर्णय वित्त विभागाने दिनांक ४-११-२०११ रोजी काढला आहे.सदर निर्णयाची प्रत शासनाच्या वेब साईटवर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment