आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

यशदा संस्थेने प्रसिध्द केलेले मराठीतील नवीन पुस्तक " महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९

                                                         
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९(मराठी) हे श्रीधर जोशी, भा.प्र.से.(नि) व माजी उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, यांनी संपादित केलेले पुस्तक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या राज्याच्या अग्रणी प्रशिक्षण संस्थेने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात ३१- ०८- २०१२ पर्यंत सुधारित नियम ,महत्वाच्या टीपा,  महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके, चौकशी अधिकारी/सादरकर्ता अधिकारी/ बचाव सहाय्यक/ शिस्तभंगविषयक अधिकारी/ अपीलीय अधिकारी इत्यादींसाठी मार्गदर्शक सूचना,न्यायालयीन निर्णय इत्यादी माहिती दिली आहे. सदर पुस्तक चौकशी अधिकारी, विभागीय अधिकारी व कर्मचारी तसेच वकील वर्गास देखील उपयुक्त आहे.

सदर  पुस्तक यशदा संस्थेत १५०  रुपयांस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीसाठी ०२०-२५६०८२६६ या दूरध्वनीवर श्रीमती मनीषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment