आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

निवृत्ती वेतनधारक व विभागीय कार्यवाही

शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याचेविरुध्द चालू असलेली विभागीय चौकशी संपुष्टात येते काय, सेवानिवृत्तीनंतर विभागीय कार्यवाही चालू करता येते काय व त्याचा निवृत्ती वेतनावर काय परिणाम होतो . यासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा नियमात नेमक्या काय तरतुदी आहेत याबाबतची विचारणा अधिकारी, कर्मचारी विशेषत: सेवानिवृत्त होणा-या किंवा सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-याकडून वारंवार केली जाते. म्हणून यासंदर्भातील सेवानिय्मात नेमक्या तरतुदी व नेहमी त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा लेख नुकताच यशदातर्फे प्रकाशित केल्या जाणा-या " यशोमंथन " या मासिकात प्रसिध्द करण्यात आला आहे.तो लेख या ब्लॉगवर " महत्वाचे संदर्भ " या शीर्षकाखाली देण्यात आला आहे. संबंधितानी तो जरूर वाचा व जरूर तर तो डाउनलोड करून घ्यावा.

1 comment: