आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

पोलीस अधिका-यांच्या बदल्यासाठी व नेमणुकीसाठी असलेल्या पोलीस आस्थापना मंडळ -- पुनर्स्थापना

पोलीस अधिका-याच्या नेमणुकीत व त्यांच्या बदल्या करताना राजकीय ह्स्तक्षेप व  पैशांची देवाण घेवाण होते अशी टीका सतत केली जात असे. अशी टीका टाळण्यासाठी व बदल्यांचे योग्य नियमन व्हावे म्हणून  शासनाने बदल्यांच्या संदर्भात शिफारशी  करण्यासाठी असलेल्या  पोलीस आस्थापना  बोर्डाची (मंडळे) पुनर्स्थापना  करण्याचा महत्वपूर्ण निर्णय  शासनाने  घेतला आहे.

पोलीस अधीक्षक व त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिका-यांच्या बदल्या संदर्भात शिफारस करणारे आस्थापना  मंडळ अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांचे अध्यक्षते खाली असेल . पोलीस महासंचालक हे उपाध्यक्ष असतील.तसेच लांचलुचपत विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व मुंबईचे पोलीस आयुक्त सदस्य असतील .पोलीस आस्थापना सांभाळणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक हे सदस्य सचिव असणार आहेत.

पोलीस उप अधीक्षक व त्यापेक्षा कमी दर्जाच्या पोलीस अधिका-यांच्या बदल्यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी पोलीस महासंचालक यांचे अध्यक्षतेखाली दुसरे आस्थापना  मंडळ  असणार आहे. लांचलुचपत विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व मुंबईचे पोलीस आयुक्त सदस्य असतील .कायदा व सुव्यवस्था विभाग  सांभाळणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक हे सदस्य सचिव  असणार आहेत.  

No comments:

Post a Comment