आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

श्री .प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली

आज प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिन. त्यांनी विविध क्षेत्रात मोठे कार्य करून आपला ठसा उमटविला.समाजसुधारक, इतिहासकार, उत्तम वक्ते , झुंजार पत्रकार म्हणून ते प्रसिध्द होते. महात्मा फुले, गोपालकृष्ण आगरकर, शाहू महाराज हे त्यांची दैवते व स्फूर्तिस्थाने होती. सामाजिक व धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांनी चालविलेल्या "प्रबोधन' या मासिकामुळे ते प्रबोधनकार झाले.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांना तुरुंगवास घडला . स्वराज्याचा खून , माझी जीवनगाथा , छत्रपती आणि रंगो बापुजी, इत्यादी पुस्तके लिहिली. त्यांचे लेखन कुमारांसाठी खूप प्रेरणादायी होते. दि, २० नोव्हेंबर १९७३ रोजी त्यांचे निधन झाले.
थोर समाजसुधारक व उत्तम वक्ते श्री .प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली

No comments:

Post a Comment