आपण आपल्याच जखमांना नको तितके कुरवाळत बसतो. दुस-यांची दु:खं आपल्याला दिसत नाहीत. आपण घोड्यासारखे ढापणं लावून आजूबाजूची दृष्टी बंद करून टाकतो. आपल्याला आपलच दु;ख पहाडासारखे मोठं वाटते. इतरांचे सगळ नगण्य, क्षुल्लक.. आपण आपल्या जखमा भिंगातून बघत असतो. त्याचे कोडकौतुक देखील करतो. इतरांकडून सहानुभूती कमवायची आणि प्राप्त परिस्थितीची किंवा ती दूर करण्याविषयी आपली जबाबदारी झटकून टाकायची, हे यातून अलगद साधून घेतो
"विचार बदला, आयुष्य बदलेल " या डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या पुस्तकातून
"विचार बदला, आयुष्य बदलेल " या डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या पुस्तकातून
No comments:
Post a Comment