आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

बिघडा बाळांनो बिघडा

शिवबांच्या राज्यांत
शिवबांचे नांव जपत
शिवबांचा वारसा सांगत
दारु गाळतात कुणी कुणी
अन्नाची नासाडी करून
गरीबाचा घास पळवून
अन् हाकारतात कोवळ्या कळ्यांना --
या बाळांनो या
फुकट पाजतो दारु ती प्या
बेधुंद होऊन नाचा
बिघडा बाळांनो बिघडा
उद्याचे आहांत तुम्ही मतदार
आमच्या राजभोगाचे
मावळ्यांनी नाही का आपली निष्ठा महाराजांच्या पदरांत टाकली
तुम्ही पण टाकाल तुमची मते आमच्याच पदरांत
खात्री आहे आम्हाला
रायरेश्वराच्या चरणी स्वराज्य-स्थापनेची शपथ घेणा-या शिवबांची शपथ
आमच्या राजसत्तेत तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही
अशा मद्यधुंद पार्ट्या
बिघडा बाळांनो बिघडा
तुमच्या बिघडण्यांतच दिसतो आम्हाला आमचा सुवर्णकाळ —
 
कवी सौ. लीना मेहेंदळे ,भा.प्र.से.(नि)

No comments:

Post a Comment