आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी निकष - जातपडताळणी समितीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्या मार्गदर्शक सूचना

आनंद विरूध्द जातपडताळणी समिती (एआयआर 2012 सुप्रीम कोर्ट 314  या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जातपडताळणी समिती तर्फे केल्या जाणा-या जातपडताळणीसाठी निकष ठरवून  दिले आहेत.

या प्रकरणात आनंद याना उपविभागीय आधिकारी यवतमाळ यानी ते" हळबी" या अनुसूचित जातीचे आहेत असे प्रमाणपत्र दिले होते.( आनंद हे इंजिनीअर असून महाराष्ट्र पोल्युशन बोर्डात फील्ड अधिकारी म्हणून कार्यरत आहेत). सदरचे प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले. आनंद यानी या निर्णयाला रिटपिटीशन द्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. सदर रिट पिटीशन उच्च न्यायलयाने फेटाळला.त्या निर्णयाविरूध्द आनंद यानी सर्वोच्च न्यायालयात अपील केले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून व या अगोदरच्या न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देऊन जातपडताळणी समिती व उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला व प्रकरण पुन्हा जातपडताळणी समितीकडे विचारार्थ व निर्णयासाठी परत पाठाविलॆ.कोर्टाने आपला निवाडा देताना जातपडताळणीचे महत्वपूर्ण निकष ठरवून दिले आहेत.

वर नमूद केलेल्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचे संपूर्ण  निकालपत्र या ब्लॉग वर " महत्वाचॆ न्यायालयीन निर्णय " या शिर्षकाखालील पत्रकात अनुक्रमांक 10 वर उपलब्ध आहे.संबंधिताना ते जरूर तर डाऊनलॊड करून घेता येईल.
 

No comments:

Post a Comment